Israel Palestine : काही तासांत बत्ती गुल होणार...अन्नधान्य, औषधांची टंचाई...उद्धवस्त संसार; हमासमुळे गाझा पट्टीत सामान्यांना नरकयातना; पाहा फोटो
2.3 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाने हमासच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत 900 लोक मारले गेले असल्याचे वृत्त आहे. तर, 4,600 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 260 मुले आणि 230 महिलांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल जझीराच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीतील लोक भुकेने आणि तहानने त्रस्त आहेत. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे येत्या काही दिवसांत अन्न टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
हमासचा शेवटचा दहशतवादी मारला जाईल तेव्हाच हे युद्ध संपेल, असे इस्रायलचे म्हणणे आहे.
'बीबीसी'च्या वृत्तानुसार, गाझा येथील रुग्णालयातील जनरेटर सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाचा साठा लवकरच संपणार आहे.
गाझाचे आरोग्य मंत्री माई अल-कैला म्हणाले की, गाझा पट्टीच्या रुग्णालयांमध्ये जनरेटर चालवण्यासाठी इंधनाचा साठा उद्या म्हणजेच गुरुवारी (12 ऑक्टोबर) संपणार आहे.
'अल जझिरा'च्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र दोन लाख विस्थापित लोकांना आश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे. हे गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के आहे.
गाझातील लोकांना वीज पुरवठा होत नाही. पाणी आणि खाद्यपदार्थ नाहीत. बेकरीसमोर लोक रांगेत उभे आहेत. काही मोजक्याच ठिकाणी पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, आरोग्य विभागाच्या दोन मंत्र्यांनी सांगितले आहे की येत्या 24 तासांत औषधे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
पॅलेस्टिनी ऊर्जा अधिकाऱ्याने सांगितले आहे की, पुढील काही तासांत गाझामधील शेवटच्या वीज प्रकल्पातील इंधनही संपणार आहे.
सोमवारपासून इस्रायलने गाझाला होणारा वीजपुरवठा बंद करून संपूर्ण 'नाकाबंदी' जाहीर केली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.