Virat Kohli Ind vs Aus 3rd Test : रेकॉर्डचा बाप, किंग कोहलीने सोडली गाबाच्या मैदानात छाप, पिचवर पाय ठेवताच थेट मास्टर ब्लास्टरच्या रांगेत मिळवलं स्थान!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मैदानात येताच विराट कोहलीने आपले अनोखे शतक पूर्ण केले.
विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा 100 वा सामना असून अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
होय, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 110 सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता या खास यादीत विराट कोहलीने एन्ट्री मारली आहे.
वर्ल्ड क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानावर आहे.
या यादीत श्रीलंकेचे दोन दिग्गज सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्धने यांच्या नावाचाही समावेश आहे.
विराट कोहलीने आता या महान खेळाडूंमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.