Garlic : पचनसंस्थेपासून ते कोलेस्टेरॉलपर्यंत लसूण खाल्ल्याने होतात होतात प्रचंड फायदे!
हिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी गरम गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. लसणाच्या पाकळ्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
लसूण खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते, तर तुटलेली हाडे मजबूत करण्यासाठी लसणाचे सेवन प्रभावी ठरते.
लसूणमध्ये अँटि-इंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट व्यतिरिक्त, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळतात.
लसणात ॲलिसिन कंपाऊंड आढळतो त्यामुळे लसणाची प्रकृती उष्ण असते. लसणाचे सेवन केल्याने सर्दी किंवा फ्लूची शक्यता कमी होते.
लसूण खाल्ल्याने युरिक ॲसिड कमी होऊ शकते. लसूण खाल्ल्याने शरीरातील प्युरीनची पातळी कमी होते, त्यामुळे युरिक ॲसिड कमी होऊ शकते.
युरिक ऍसिडचे रुग्ण दररोज लसणाच्या 2 पाकळ्या खाऊ शकतात.
लसणाच्या सेवनानेही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. लसणात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
लसूण खाल्ल्याने शिरांमधील कोलेस्टेरॉल कमी होते, ज्यामुळे नसांमध्ये रक्त प्रवाह वाढतो.
रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या २ पाकळ्या पाण्यात भिजवाव्यात. यानंतर सकाळी याचे सेवन करा.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर लसणाचे सेवन करू नका.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )