T20 World Cup 2021: विराट कोहलीसह 'या' फलंदाजांनी टी -20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्यात
अनेक फलंदाज टी -20 विश्वचषकात चमकले आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टी -20 विश्वचषकाच्या सहा आवृत्त्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज पुढीलप्रमाणे... श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धन या स्पेशल क्लबमध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनचे नाव प्रथम येते. टी -20 विश्वचषकात त्याच्या नावावर 1016 धावा आहेत. या टी -20 विश्वचषकात जयवर्धनला संघाचा सल्लागार बनवण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेलला टी -20 मधील सर्वात स्फोटक फलंदाज मानले जाते. गेलच्या नावावर सर्वात जास्त षटकारांपासून ते टी -20 मधील सर्वाधिक धावांचे हे सर्व विक्रम आहेत. टी -20 विश्वचषकातही तो 920 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी तो जयवर्धनला मागे सोडून पहिल्या क्रमांकावर विराजमान होऊ शकतो.
श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने टी -20 विश्वचषकात 897 धावा केल्या आहेत. त्याच्या दिलस्कूपसाठी प्रसिद्ध दिलशान या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे सध्या टी -20 विश्वचषकात 777 धावा आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेला कोहली यावर्षी जयवर्धनला मागे टाकत पहिल्या क्रमांकाचे स्थान घेऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने आपल्या कारकिर्दीत टी -20 विश्वचषकात 717 धावा केल्या. प्रसिद्ध डिव्हिलियर्स आता 'मिस्टर 360' या नावाने निवृत्त झालाय. तरिही, तो या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत टी -20 विश्वचषकात 673 धावा केल्या आहेत. या वर्षी तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अनेक स्थानांनी वर जाऊ शकतो.