In Pics : बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत, पहिल्या डावात उभारला 404 धावांचा डोंगर
सध्या भारत बांगलादेश कसोटी मालिका सुरू असून पहिल्या डावात भारतान 404 धावांचा डोंगर उभा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावल्यवर भारत कसोटीत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचच लक्ष्य आहे.
त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीच्या दृष्टीनं ही मालिका महत्वाची आहे . त्यामुळे भारताला विजय मिळवनं अत्यंत महत्वाचं आहे.
भारतानं सामन्याची सुरुवातही तशी दमदार केलीच आहे. कर्णधार केएल राहुल, सलामीवीर शुभमन गिल आणि कोहली स्वस्तात माघारी परतले.
पण त्यानंतर पंतने त्याच्या नावाला साजेशी 46 धावांची दमदार खेळी केली.
त्यानंतर पुजाराने श्रेयस अय्यर सोबत भारताचा डाव सावरला आणि एका दमदार भागिदारी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी केली.
पण पुजारा 90 आणि अय्यर 86 धावांवर बाद होताच, भारताचा डाव ढासळेल असे वाटत होते. ज्यानंतर कुलदीप आणि आर आश्विन यांनी डाव सावरला.
भारताची धावसंख्या 400 पार पोहचवण्यात दोघांनी मदत केली. कुलदीपनंं 40 तर आश्विननं 58 धावा केल्या.
आता दुसरा दिवस संपताना बांगलादेशची धावसंख्या 133 वर 8 बाद अशी झाली आहे.
सध्या बांगलादेश 271 धावांनी पिछांडीवर असून तिसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.