Rohit Sharma : सचिन तेंडुलकरच्या काळातील नकोसा विक्रम, रोहित शर्मावर तशीच वेळ येणार? टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार कारण..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिका भारतानं 3-0 अशी जिंकली. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पहिली मॅच टाय झाली तर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारतावर 32 धावांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला तिसऱ्या वनडे मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. यासाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीचा योग्य प्रकारे सामना करावा लागेल. तर, भारताच्या फिरकी गोलंदाजांना देखील श्रीलंकेच्या विकेट घ्याव्या लागतील.
भारतानं 1997 पासून आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. 1997 ते 2024 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात 11 मालिका झाल्या. या मालिकांमध्ये भारतानं विजय मिळवला.
श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्त्वातील संघानं 1997 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला 3-0 असं पराभूत केलं होतं.त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघावर 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावण्याचं सावट निर्माण झालं आहे. सचिन तेंडुलकरचा नकोसा विक्रम आपल्या नावावर देखील होऊ नये यासाठी रोहित शर्मा देखील ताकदीनं मैदानावर उतरु शकतो.
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळाची सुरुवात मालिका विजयानं होणार नसली तरी पराभवानं देखील होऊ नये यासाठी भारतीय क्रिकेट संघाला दमदार खेळ करावा लागेल.