IND vs SL : शिवम दुबेचं स्थान संकटात? भारताला त्या तीन चुका टाळाव्या लागणार, अन्यथा मालिका हातून निसटणार
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे उद्या कोलंबोमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिली मॅच टाय झाल होती. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतीन सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंका आता1-0 अशी आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी लढावं लागणार आहे. भारतानं तिसरी वनडे जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटणार आहे.
रोहित शर्मापुढं भारताच्या मधल्या फळीच्या कामगिरीची चिंता आहे. भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं विकेट गमावत आहेत. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढं भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत.
दोन्ही मॅचमध्ये भारतीय संघानं 10 विकेट गमावल्या. त्यातील एक विकेट वेगवान गोलंदाजानं तर एक विकेट धावबाद झाल्यानं गेली होती. दोन्ही मॅचमध्ये एकूण 18 विकेट भारतानं फिरकी पुढं गमावल्या होत्या.
रोहित शर्माला तिसरी वनडे जिंकायची असल्यास काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामध्ये पहिला भारताच्या फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरं म्हणजे भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. तर, तिसरा निर्णय म्हणजे संघ निवडीत योग्य काही मोठे निर्णय घ्यावे लागतील.
रोहित शर्मा तिसऱ्या मॅचसाठी टी 20 मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रियान परागला शिवम दुबेच्या जागी संधी देऊ शकतो. त्यामुळं शिवम दुबेचं संघातील स्थान सध्या डेंजर झोनमध्ये आहे.