IND vs SL : भारताचे फलंदाज ढेपाळले, स्पिनर्स फेल झाले, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचं गणित नेमकं कशामुळं फसलं?
भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 27 विकेट फिरकी गोलंदाजांसमोर गमावल्या. एखाद्या संघाविरुद्ध अशी वेळ भारतावर पहिल्यांदा आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक मॅचमध्ये 9 विकेट फिरकी गोलंदाजांसमोर गमावल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडली.
विराट कोहलीसारखा खेळाडू तीन मॅचमध्ये एलबीडब्ल्यू आऊट झाला. भारताकडून रोहित शर्मा वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
भारताविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये चारिथ असलंका आणि वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे यांनी दमदार गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅचमध्ये जेफरी वेंडरसे यानं सहा विकेट घेतल्या. तर, तिसऱ्या मॅचमध्ये दुनिथ वेल्लालगेनं पाच विकेट घेतल्या.
भारताचे फिरकी गोलंदाज या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या करिअरमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा मालिकेत पराभव स्वीकारावा लागला.