Shubman Gill : शुभमन गिलचा पाय बाऊंड्रीला लागल्याचा दावा, श्रीलंका बोर्डानं शेअर केलेल्या फोटोवरुन तर्क वितर्क
सूर्यकुमार यादवनं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत डेव्हिड मिलरचा कॅच बाऊंड्रीवर घेतला होता. त्यावेळी त्या कॅचवरुन वाद निर्माण झाला होता. तसाच वाद शुभमन गिलनं कुसल मेंडिसच्या घेतलेल्या कॅचवरुन दावे प्रिदावे करण्यात येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुलदीप यादव श्रीलंकेविरुद्ध 49 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्या ओव्हरमध्ये कुसल मेंडिसनं षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाऊंड्रीवर असलेल्या शुभमन गिलनं कॅच घेतला. पाय बाऊंड्रीला लागेल असं वाटत असतानाच गिलनं बॉल हवेत टाकला. यानंतर सीमारेषेबाहेर जाऊन गिल माघारी ग्राऊंडमध्ये आला आणि त्यानं कॅच घेतला.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मॅचसंदर्भातील अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये शुभमन गिलनं घेतलेल्या कॅचचा देखील फोटो आहे. या फोटोचा दाखला देत काही जणांकडून शुभमन गिलचा पाय बाऊंड्रीला लागल्याचा दावा केला जात आहे.
श्रीलंकेनं भारताविरुद्ध 50 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 248 धावा केल्या आहेत. यामध्ये निसांकानं 45, फर्नांडोनं 96 आणि कुसल मेंडिसनं 59 धावा केल्या.
श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताला मालिका वाचवण्यासाठी आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे.