Rohit Sharma : रोहित शर्माला तेव्हा दक्षिण आफ्रिकेत 'चक्कर'येऊ शकते, भारताच्या माजी खेळाडूचा गंभीरच्या 'त्या' भूमिकेवर सवाल
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं 22 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बराच काळ क्रिकेट खेळू शकतात. फिटनेस चांगला ठेवल्यास ते 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतात, असं म्हटलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी प्रमुख के. श्रीकांत यांनी गौतम गंभीरच्या मतावर आक्षेप घेतला आहे. विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकेल, असं ते म्हणाले.
रोहित शर्मा चांगला खेळाडू आहे, त्याचं सध्याचं वय 37 वर्ष आहे. वनडे वर्ल्ड कपला अजून तीन वर्ष बाकी आहेत म्हणजे वर्ल्डकप वेळी रोहित शर्मा 40 वर्षांच असेल. वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही वर्ल्ड कप खेळू शकत नाही, असं के श्रीकांत म्हणाले.
विराट कोहली 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतो मात्र रोहित शर्माचा विचार केला असता 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याला चक्कर येऊ शकते, असं के. श्रीकांत त्याच्या मुलाच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होते.
दरम्यान गौतम गंभीर याचा भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 27 जुलैपासून सुरु होत आहे.