Gautam Gambhir : गौतम गंभीरनं कोचिंग नव्हे फक्त एक काम करावं, संदीप पाटील यांच्याकडून श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी लाखमोलाचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघ टी 20 मालिका आणि वनडे मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. 27 जुलै म्हणजेच उद्यापासून टी 20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपासून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा कार्यकाळ सुरु होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी गौतम गंभीरबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. गौतम गंभीरनं खेळाडूंना कोचिंग करण्याऐवजी मदत करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
संदीप पाटील पीटीआयसोबत बोलताना म्हणाले की, गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये केकेआरचा कोच म्हणून चांगलं काम केलं आहे. तो भारतीय संघाला मदत करेल, अशी आशा असल्याचं संदीप पाटील म्हणाले.
गौतम गंभीरनं भारतीय संघाला कोचिंग करणं हे त्याचं काम आहे असं वाटत नाही. त्यानं टीमला मदत केली पाहिजे. तुम्हाला खेळाडूंचं व्यवस्थापन करण्याचं काम करावं लागतं. गौतम गंभीरपुढे हे आव्हान असेल, असं संदीप पाटील म्हणाले. भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना देखील तो मदत करेल, असं पाटील म्हणाले.
रवी शास्त्री यांनी गौतम गंभीर समकालीन प्रशिक्षक आहे. आयपीएलचं 2024 सत्र चांगलं राहिलं होतं. गौतम गंभीर भारतीय संघात नाविन्य घेऊन येईल,असं वाटत असल्याचं रवी शास्त्री म्हणाले. गौतम गंभीरला शिस्त महत्त्वाची वाटते, असं देखील त्यांनी सांगितलं.