Team India: रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमध्ये जोरदार भांडण; वरिष्ठ खेळाडूंची कर्णधाराला साथ, नेमकं काय घडलं?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगणार आहे.(Image Credit-BCCI)
2 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना होणार आहे. मात्र यासामन्याआधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Image Credit-BCCI)
कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Image Credit-BCCI)
गौतम गंभीर जे निर्णय घेत आहे किंवा घेऊ इच्छित आहेत त्यावर कर्णधार रोहित शर्मा अजिबात खूश नसल्याचं सांगण्यात येत आहे. (Image Credit-BCCI)
गौतम गंभीरने स्पष्ट केले आहे की, तो जो काही निर्णय घेईल, तो संपूर्ण संघाला स्वीकारावा लागेल. यावरुनच रोहित शर्मा आणि गौतम गंभीरमध्ये भांडण झालं, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. (Image Credit-BCCI)
भारताने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली आणि आता न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. (Image Credit-BCCI)
विशेषत: वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर खूश नाही. (Image Credit-BCCI)
गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीही धावा करू शकले नाहीत. (Image Credit-BCCI)
रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या वादात टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू कर्णधार रोहित शर्माच्या बाजूने असल्याचं सांगण्यात येत आहे. (Image Credit-BCCI)