Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024: 10 वाजता मैदानातच लोळत पडला, चालताही येईना, 10.30 वाजता पळ पळ पळाला, गुलबदीन नईबच्या ॲक्टिंगने 'ऑस्कर'लाही लाजवलं!
अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डकर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 08 धावांनी पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. आता अफगाणिस्तानचा संघ 26 जून रोजी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.
अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक 4-4 विकेट्स घेतल्या. याशिवाय फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी 1 विकेट घेतली.
एकीकडे अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं कौतुक होत असताना दुसरीकडे गुलबदीन नईबच्या अॅक्टिंगची चर्चा रंगली आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात पावसानं अनेकदा व्यत्यय आणला. त्यावेळी अफगाणिस्तानचा प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटनं त्याच्या खेळाडूंना सामन्याचा वेग कमी करण्यास सांगितलं.
ट्रॉटनं डगआऊटमधून इशारा करताच स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला गुलबदीन नईब थेट मैदानात आडवा झाला.
गुलबदीन नईबला सामना सुरु असताना साधारण 10 वाजता चालताही येत नव्हतं. मात्र 10.30 वाजता सामना जिंकल्यानंतर तो मैदानात पळत सुटला होता.
नईबच्या या कृतीमुळे खिलाडूवृत्तीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
वास्तविक या सामन्यात पावसाचा वारंवार हस्तक्षेप होत होता. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला 19 षटकांत 114 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र बांगलादेशचा संघ 17.5 षटकांत 105 धावांत सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दास शेवटपर्यंत स्थिर राहिला, पण विजय मिळवण्यात अपयशी ठरला.