Angarki Chaturthi 2024 : आज अंगारक संकष्ट चतुर्थीला शुभ ग्रहांचा योग; 'या' राशी ठरतील लकी, मिळणार चिक्कार लाभ
आज अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योगासह अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया शुभ योगांच्या एकत्र येण्याने मेष राशीसह अन्य राशींना देखील याचा लाभ मिळणार आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी फार लाभदायक असणार आहे. आजच्या दिवशी तुमची कामं फार वेगाने वाढतील.
तुमच्या तब्येतीतही चांगली सुधारणा दिसून येईल. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. कुटुंबात चांगलं वातावरण निर्माण होईल.
आज लाभासाठी तुम्हाला अनेक चांगले योग जुळून येतील. तुमच्या संपत्तीत चांगली भरभराट होईल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल.
नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. तुमच्या कारभारात चांगली वाढ दिसून येईल.
अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सहभाग मिळेल.
तसेच, तुमची कामं अगदी सहजतेने पूर्ण होतील. नवीन काम, व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजच्या दिवशी तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.
आजचा दिवस तुमच्यासाठी फार खास असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विवाहा संबंधित तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नशिबाची साथ मिळेल. तसेच, धनलाभाचाही चांगला योग जुळून आला आहे.
आजचा दिवस तुमचा सर्वार्थाने सकारात्मक असणार आहे. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर हा काळ चांगला आहे.
मित्रांच्या सहाकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.