Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजय देवगणने लाखो गुंतवलेल्या 'या' कंपनीने अनेकांना केलं करोडपती; पाच वर्षांत शेअर बनला रॉकेट!
Multibagger Stock: अभिनेता अजय देवगण हा अभिनेता असला तरी तो गुंतवणुकीच्या बाबतीतही फारच जागरुक आहे. त्याने गुंतवणूक केलेल्या एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजय देवगणने गुंतवणूक केलेल्या कंपनीने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून या कंपनीत गुंतवणूक असलेले गुंतवणूकदार आज कोट्यधीश झाले आहेत.
शुक्रवारी (21 जून) या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली.
या कंपनीचे नाव पॅनोरमा स्टुडिओज असे असून या कंपनीचा शेअर शुक्रवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 8 टक्क्यांनी वाढून 985 रुपयांवर पोहोचला होता.
या कंपनीने नुकतेच धमाल-4 या चित्रपटासाठी सुपर कॅसेट्स इँडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड आणि मारुती इंटरनॅशनल या दोन कंपन्यांशी 113.80 कोटी रुपयांचा करार केला आहे. या वृत्तानंतरच या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
अजय देवगणजवळ या कंपनीचे एकूण 1 लाख इक्विटी शेअर्स आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 1,301.84 कोटी रुपये आहे.
शुक्रवारी या कंपनीचा शेअर 975.40 रुपयांवर बंद झाला. सोमवारी हा शेअर दिवसाअखेर 987.25 रुपयांवर पोहोचला होता.
एका महिन्यात या कंपनीच्या समभागात 10 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
गेल्या सहा महिन्यांत या कंपनीचा शेअर 245.03 टक्क्यांनी तर एका वर्षात हा शेअर 280 टक्क्यांनी वाढला आहे. पाच वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3,938.92 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)