T20 World Cup 2024: कमी लेखू नका...टी-20 विश्वचषकात 5 संघांपासून सावध राहण्याची गरज; कधीही करु शकतात उलटफेर!
T20 विश्वचषक 2024 स्पर्धा 1 जूनपासून (2 जून भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. यावेळी या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात 20 संघ खेळत आहेत. यापैकी असे पाच संघ आहेत ज्यांच्याविरोधात सर्व मोठ्या संघांनी सावध राहण्याची गरज आहे. (image credit-ICC)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेदरलँड क्रिकेट संघाला कमी लेखणे मोठ्या संघांसाठी मोठी चूक ठरू शकते. कारण T20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यात नेदरलँड्सचा सामना 4 क्रमांकाच्या सराव सामन्यात झाला होता. या सामन्यात नेदरलँड्सने श्रीलंकेचा 20 धावांनी पराभव केला.(image credit-ICC)
स्कॉटलँड राष्ट्रीय क्रिकेट संघाची ही सहावी T20 विश्वचषक स्पर्धा आहे. T20 विश्वचषक 2021 मध्ये स्कॉटलंडने बांगलादेशसारख्या संघाला पराभूत करून गटात अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे स्कॉटलंडला सुपर 12 मध्ये प्रवेश मिळाला. (image credit-ICC)
नामिबिया क्रिकेट संघाने T20 विश्वचषक 2024 साठी तीन सराव सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने त्याने जिंकले आहेत. सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आपल्या पहिल्या सराव सामन्यात नामिबियाने युगांडाचा 5 विकेट राखून पराभव केला. (image credit-ICC)
आयर्लंड क्रिकेट संघाने T20 विश्वचषक 2009 मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंडने बांगलादेशचा पराभव करून सुपर 8 मध्ये स्थान मिळवले. या पराभवानंतर बांगलादेश टी-20 विश्वचषकातून सुपर 8 मध्ये स्थान न मिळवता बाहेर पडला.(image credit-ICC)
नेपाळ क्रिकेट संघ 2024 टी-20 विश्वचषकही खेळणार आहे. नेपाळचा पहिला सामना 4 जून रोजी नेदरलँडशी होणार आहे. या संघाच्या नावावर टी-20 सामन्यांमध्ये खास रेकॉर्ड आहे. नेपाळ क्रिकेट संघ हा एकमेव संघ आहे जो टी-20 मध्ये 300 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. हा विक्रम 27 सप्टेंबर 2023 रोजी मंगोलियाविरुद्ध झाला होता.(image credit-ICC)