Team India : रोहित सूर्यासमोर बुमराह-सिराजची बॉलिंग, हार्दिककडून गोलंदाजीची उजळणी , टीम इंडियाच्या सराव सत्रात काय घडलं?
भारताचा क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघ दाखल झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या खेळाडूंनी पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीचा सराव केला.
हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहनं रोहित शर्मा आणि सूर्य कुमार यादवला बॉलिंग केली.
मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगनं बॅटिंग करण्याचा सराव केला. रोहित शर्मासह शिवम दुबे आणि संजू सॅमसन देखील सराव सत्रात पाहायला मिळाले.
कुलदीप यादवनं बॉलिंग आणि फलंदाजीचा सराव केला. भारतीय संघानं जवळपास तीन तास सराव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्यात खेळपट्टी कशी राहील याचा अंदाज येईल. रिषभ पंतनं देखील सराव सत्रात फलंदाजी केली.
हार्दिक पांड्यानं एक तास बॉलिंग केली. त्यानंतर हार्दिकनं फलंदाजीचा सराव केला. यानंतर त्यानं बॅटिंग कोच विक्रम राठोडसोबत चर्चा केली.