T20 World Cup 2024 AFG vs BAN: ते एकमेव व्यक्ती म्हणाले, आम्ही सेमी फायनल गाठू; आम्ही भेटलो, शब्द दिला अन् आज...; राशिद खान काय म्हणाला?
आज टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने बांगलादेशचा (Afghanistan vs Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडकर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 08 धावांनी पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला. अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे.
टी-20 विश्वचषकात सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात होता. अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा, पापुआ न्यू गिनीआ आणि ऑस्ट्रेलियाता पराभव केला होता.
आज हीच विजयी घोडदौड कायम ठेवत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानने एका दगडात दोन शिकार केल्याचं बोललं जात आहे. आता अफगाणिस्तानचा संघ 26 जून रोजी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
कर्णधार राशिद खान नेमकं काय म्हणाला?- सामन्यानंतर बोलताना राशिद म्हणाला की, आम्ही आमच्या मायदेशात परतल्यावर जोरदार जल्लोष करू. आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. मला याबद्दल बोलण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत.
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला विजयानंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराचे शब्द आठवले.
ब्रायन लारा हा एकमेव जाणकार होता ज्याने अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठेल असे सांगितले होते. आम्ही त्याला भेटलो आणि तुझ्या शब्दांवर आम्ही खरे उतरू असे सांगितले होते. जे आत सत्यात उतरले आहे.
उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तर अफगाणिस्तान अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल.
अफगाणिस्ताननं इतिहास रचला- अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं त्यानंतर आज बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम रहमानुल्लाह गुरबाजनं 43 धावा केल्या. यानंतर राशिद खान आणि नवीन-उल-हक या दोघांनी प्रत्येकी चार विकेट संघाला विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानच्या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.