Arnala beach Whale: अबब! अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर 100 फुटांच्या व्हेल माशाचं अजस्त्र धुड पाहायला एकच गर्दी

विरारच्या अर्नाळा किल्ला परिसरात समुद्रकिनारी भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भरतीच्या पाण्यात हा व्हेल मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आला आहे.

जवळपास या व्हेल मशाची लांबी 80 ते 100 फुट लांब असून रुंदी ही चार फुटांच्या वर आहे.
स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी अर्नाळा सागरी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली.
दुर्मिळ असा हा व्हेल मासा एका मोठ्या बोटीचा मार लागल्याने जखमी होऊन मृत झाला.
ही प्राथमिक माहिती अर्नाळा स्थानिक मच्छिमारांनी दिली आहे.
हा व्हेल मासा वयस्कर असून माशांमधील मोठ्या प्रजातीचा असल्याचं समोर आलं आहे.
अर्नाळा सागरी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून मृत व्हेल माशाला जेसीबीच्या मदतीने समुद्रकिनाऱ्यावर खोल खड्डा करून गाडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मृत व्हेल मशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
मोठ्या प्रमाणात या व्हेल मशाला पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले होते.