मेरी मर्जी.. सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये जयश्री पाटील
राज्यातील एसटी कामगारांच्या संपामुळे महाराष्ट्रभर चर्चेत आलेला वकील गुणरत्न सदावर्ते हे या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडी सरकारकडून पुकारण्यात आलेल्या बंदविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावर निर्णय देत हायकोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत
गुणरत्न सदावर्तेंसह त्यांच्या पत्नी जयश्री पाटील सदावर्ते याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून कायदेशीर लढाई लढत असतात, अनेक खटल्यात त्यांनी याचिका दाखल केली आहे.
आता, सदावर्ते दाम्पत्य वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. यापूर्वीही सदावर्ते यांची देहबोली, आवाज आणि हटके लूक असल्याने ते चर्चेत असत. तसेच, त्यांच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होते. मात्र, त्यांचा नवा लूक समोर आलाय
मिस्टर अँड मिसेस सदावर्तेंचा हा लूक एकदम हटके असून जयश्री पाटील ह्या करेबियन लूकमध्ये दिसून आल्या आहेत
करेबियन लूकसह डोळ्यावर गॉगल आणि अंगावर ब्लॅस ड्रेस परिधान केलेलं सदावर्ते दाम्पत्य हटके लूकसाठी पोज देतानाही दिसून येते.
सोशल मीडियातूनही सदावर्ते दाम्पत्याचा नवा लूक समोर आला आहे, त्यामध्ये नव्या लूकसह सदावर्ते दाम्पत्य आनंदी व उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे.