India vs England first test Hyderabad: IND VS ENG कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारताच्या नावे
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील पहिल्या दिवस भारताच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला सर्वबाद 246 पर्यंत मजल मारता आली. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवस संपेपर्यत 1 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडे अजूनही 127 धावांची आघाडी आहे. मात्र,भारताने आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावावर केला आहे. (Photo Credit : PTI)
भारताकडून रोहित शर्मा 27 चेंडूमध्ये 24 धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल 70 चेंडूमध्ये 76 आणि शुभमन गिल 43 चेंडूमध्ये 14 धावा करत क्रिजवर टिकून आहे. (Photo Credit : PTI)
भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 246 धावांवर गुंडाळला. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घेरुन ठेवलं.(Photo Credit : PTI)
भारताकडून रवींद्र जाडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. यानंतर भारताकडून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. या दोघांनी आपल्या स्टाईलमध्ये धुलाईला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 65 धावांचा टप्पा पार केला.
एकीकडे यशस्वी जयस्वालने अर्धशतक पूर्ण केलं, तर दुसरीकडे रोहित शर्मा त्याला साथ देत सावध खेळत होता. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात लीचच्या गोलंदाजीवर रोहित 24 धावा करुन माघारी परतला. रोहित बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 80 होती.(Photo Credit : PTI)
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज गोलंदाजी केली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीआणि बेन डकेत यांनी सावध सुरुवात केली. मात्र आर अश्विनने डकेतला पायचित करुन भारताला 55 धावांवर पहिलं यश मिळवून दिलं. डकेतने 39 चेंडूत 35 धावा केल्या.(Photo Credit : PTI)
त्यानंतर मग लगेचच रवींद्र जाडेजाने ओली पोपला 1 धावेवर बाद केलं. मग अश्विननेच दुसरा सलामीवीर क्रॉलीचा काटा काढला. क्रॉलीला सिराजकरवी झेलबाद केलं. त्याने 20 धावा केल्या. क्रॉली बाद झाला त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 3 बाद 60 अशी होतीयानंतर मग ज्यो रुट आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी डाव सांभाळला. दोघांनी संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. एकीकडे ही जोडी जमत आहे असं वाटत असतानाच, अक्षर पटेलने बेअस्ट्रोचा अडथळा दूर केला. (Photo Credit : PTI)
भारताच्या फिरकी तिकडीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले असताना, इंग्लंडच्या आजी-माजी कर्णधारांनी काहीसा डाव सावरला. जो रुटने 60 चेंडूत 29 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा काढल्या. (Photo Credit : PTI)
जडेजाने रुटला माघारी धाडत, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मग ठराविक अंतराने जाडेजा, अश्विन, अक्षर पटेल आणि बुमराह विकेट घेत राहिले. पण एका बाजूने बेन स्टोक्स लढत राहिला. अखेर 64.3 षटकात बुमराहने बेन स्टोक्सची दांडी उडवून इंग्लंडची शेवटची विकेट मिळवली. स्टोक्सची रुपाने इंग्लंडला दहावा धक्का बसला!(Photo Credit : PTI)