In Pics : शुभमन, ईशानसह शिखरचं पूलमधले फोटो पाहिले का? दुसऱ्या वन डेपूर्वी रांचीमध्ये Chill मूडमध्ये टीम इंडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने 9 धावांनी गमावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यानंतर आता मालिकेतील आव्हान जिवंत ठेण्यासाठी भारत दुसरा सामना खेळणार आहे.
मालिकेतील दुसरा सामना रांची येथे रविवारी (9 ऑक्टोबर) पार पडणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडीया रांची येथे पोहोचली असून तेथील सुदंर वातावरणात भारतीय स्टार बरेच फोटो काढत आहे. शुभमननेही त्याच्या ट्वीटर तीन फोटो शेअर केले आहेत.
यात तो, ईशान किशन आण शिखर धवन यांच्यासोबत निवांत मूडमध्ये दिसत आहे.
या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
पहिल्या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.
यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करुनही फलंदाज फेल झाल्याचं पाहायला मिळालं.
केवळ श्रेयस अय्यरनं अर्धशतक ठोकलं तर संजू सॅमसननं नाबाद 86 धावा ठोकत अखेरपर्यंत झुंज दिली खरी पण तो सामना जिंकवू शकला नाही.
अशामध्ये आता दुसरा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. भारताने सामना जिंकला तरच मालिकेतील आव्हान जिवंत राहील. तर दक्षिण आफ्रिका जिंकल्यास ते मालिकेत विजयी आघाडी घेतली. तर या सामन्यापूर्वी माईंड फ्रेश करण्यासाठी खेळाडू चिल करत आहेत.
दुसरीकडे भारताचा दिग्गज खेळाडू असलेला संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे.