Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा दिवाळीत धमाका, विश्वचषकातील पहिले शतक झळकावले
अय्यर आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 208 (128 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान श्रेयस अय्यर 94 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 128 धावा करून नाबाद परतला. तर केएल राहुलने 64 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित-गिलकडून चांगली सुरुवात मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. अय्यरने चौथ्या स्थानावर भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली.
अय्यरने आधी विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर केएल राहुल याच्यासोबत द्विशतकी भागिदारी करत धावसंख्या वाढवली.
श्रेयस अय्यरने 94 चेंडूत नाबाद 128 धावांची खेळी केली. या खेळीत अय्यरने 5 षटकार आणि 10 चौकार ठोकले. अय्यरचे विश्वचषकातील पहिले शतक होय.
चौथ्या क्रमांकावर विश्वचषकात शतक ठोकणारा अय्यर तिसरा फलंदाज ठरलाय. याआधी सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह यांनी चौथ्या क्रमांकावर शतके ठोकली आहेत.