Salman Ali Agha Vice-Captain Pakistan : पाकिस्तानी काही करू शकतात! एकही टी-20 न खेळलेल्या खेळाडूला बनवलं उपकर्णधार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. यासोबतच बोर्डाने नवा उपकर्णधारही जाहीर केला आहे. बोर्डाने यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची वनडे आणि टी-20 साठी नियमित कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे, तर नियमित उपकर्णधारपदाची जबाबदारी सलमान अली आगाकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आघाने आतापर्यंत पाकिस्तानसाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाबर आझमच्या जागी सलमान अली आगाला पाकिस्तानचा नवा कर्णधार बनवण्यात येईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. पण 27 ऑक्टोबर रोजी बोर्डाने यष्टीरक्षक फलंदाजाची नवा कर्णधार म्हणून निवड केली. तर सलमानकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सलमानने आतापर्यंत पाकिस्तानसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर टी-20 मध्ये एकही सामना खेळलेला नाही.
30 वर्षीय आघाने पाकिस्तानकडून आतापर्यंत 17 कसोटी सामन्यांमध्ये 45.80 च्या सरासरीने 1191 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 40.58 च्या सरासरीने 487 धावा केल्या आहेत. 3 शतकांव्यतिरिक्त, त्याच्या नावावर कसोटीत 9 अर्धशतके आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने आपल्या बॅटने 4 अर्धशतके केली आहेत.
अलीकडेच पाकिस्तानने घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली, जी इंग्लंडने जिंकली. या मालिकेत आघाने आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 104 धावा केल्या होत्या, तर 30 वर्षीय फलंदाजाने दुसऱ्या डावात 63 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याने 31 आणि 63 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात त्याने 1 धाव काढली.