Diwali Skin Care: दिवाळीत चेहरा चमकेल आरशासारखा! फक्त रात्री झोपण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा, अन् कमाल बघा
दिवाळी काही दिवसांवर आहे. अशात चमकदार त्वचेसाठी रात्रीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. रात्रीच्या त्वचेची काळजी सकाळी तुमच्या चेहऱ्यावर अद्भुत चमक आणते. तसेच त्वचेच्या अनेक समस्यांपासून रक्षण करते, ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुम, दाग आणि काळे डाग आहेत, त्यांनी रात्रीच्या वेळी त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा - चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करावा. याच्या मदतीने चेहऱ्यावर साचलेली घाण, अतिरिक्त तेल काढून टाकता येते. जर तुम्ही कोणताही मेकअप लावला असेल, तर तुम्ही तुमचा चेहरा ऑइल क्लींजरने स्वच्छ करू शकता, अन्यथा वॉटर-बेस्ड क्लींजरचा वापर करावा.
रात्री झोपण्यापूर्वी घ्या ही उपचारपद्धती - ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुम, डाग किंवा सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्या आहेत, त्यांनी चेहऱ्यावर सीरम लावावा. त्वचेच्या अनेक समस्यांवर हा एक चांगला उपचार आहे. त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुरुम, हायपरपिग्मेंटेशन आणि वृद्धत्वासाठी वेगवेगळे सीरम आहेत, तुम्ही याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हायड्रेशन द्या - जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर त्वचेला हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही टोनर वापरा. चेहऱ्याला अतिरिक्त हायड्रेशन देणारा टोनर. हे चेहऱ्याच्या त्वचेवर उपस्थित अतिरिक्त तेल देखील नियंत्रित करते. असे नियमित केल्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ होतो.
झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावा - रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेशननंतर मॉइश्चरायझेशन करणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून त्वचेला होणारे फायदे लॉक राहू शकतात. यासाठी रात्री हलके मॉइश्चरायझर वापरावे. तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या त्वचेनुसार कोणताही फेस पॅक वापरू शकता.
नाइट स्किन केअर रूटीन कोणालाही निरोगी त्वचा ठेवण्यास मदत करू शकते. रात्रीच्या त्वचेच्या काळजीसाठी 4 महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला दिवाळीत चेहरा सुंदर दिसण्यासाठी नक्की मदत करतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )