वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
उत्तर भारताकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुटणाऱ्या मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर सकाळपासून या घटनेचे व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचे नियोजन कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन नीट न करता आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करुन यावरुन सरकारला जाब विचारला आहे.
आता, वांद्रेतील घटनेनंतर सणासुदीच्या काळात गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे विभागाकडून महत्त्वाची सूचना किंवा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर दिवाळी आणि छट पूजेदरम्यान प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे स्थानाकावरील गर्दी व प्रवासाची यंत्रणा सुरळीतपणे सुनिश्चित करण्यासाठी, प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती प्रतिबंधित करण्यात आली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.
मुंबईसह पुणे, नागपूर हे निर्बंध तात्काळ लागू होतील दिनांक 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. केवळ, ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांना यातून सूट देण्यात आली आहे