ऑस्ट्रेलियाचा बदला पूर्ण, आता इंग्लंडचा नंबर, रोहित शर्मा अन् टीम इंडिया 2022च्या पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज
रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावांची वादळी खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. भारतानं ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या वेगवान गोलंदाजांची धुलाई केली. वनडे वर्ल्ड कपच्या अहमदाबादमधील अंतिम फेरीच्या लढतीत भारताचा जो पराभव झाला होता त्याचा बदला घेतला.
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेटवर 205 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 20 ओव्हरमध्ये 181 धावांपर्यत पोहोचू शकलं. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा हिशोब चुकता केला.
आता भारत आणि इंग्लंड यांच्यात 27 जूनला टी20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल होणार आहे. ज्या प्रमाणं रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाचा हिशोब पूर्ण केला, त्याप्रमाणं इंग्लंडचा देखील हिशोब चुकता करावा अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये आमने सामने आले होते. भारतानं पहिलंयांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 168 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलरनं वादळी फलंदाजी केली होती. भारतानं ती मॅच 10 विकेटनं गमावली होती.आता रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं इंग्लंडला देखील उपांत्य फेरीतील लढतीत पराभवाचं पाणी पाजावं, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.