Angarki Chaturthi 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा सजला; भाविकांची अलोट गर्दी, अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त बाप्पाला सोन्यानं मढवलं, पाहा फोटो
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त खास सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाप्पाला चकाकणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं गेलं आहे.
अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज अंगारकीनिमित्त बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान करण्यात आले आहेत.
दगडूशेठ गणपती मंदिरात गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
पहाटेपासूनच मंदिराच पूजापाठ सुरू आहे.
अष्टविनायकाच्या थीममध्ये गाभाऱ्याची सजावट करण्यात आली आहे.
अष्टविनायकाचे फोटो बाप्पाच्या भोवती लावण्यात आले आहेत.
अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी भविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
मंदिरात केलेल्या मनमोहक सजावटीचं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो गणेशभक्तांची रेलचेल आताही सुरू आहे.
मंदिराला बाहेरुनही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
रात्री देखील दगडूशेठ गणपती मंदिर दिव्यांच्या रोषणाईने आणि फुलांच्या आरासात उजळून निघालं होतं.