Rohit Sharma Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटी न खेळता कर्णधार रोहित शर्मा घेणार निवृत्ती? एका फोटोमुळे उडाली खळबळ
मेलबर्न कसोटीतील दारूण पराभवानंतर टीम इंडियाकडे एकच पर्याय उरला आहे आणि तो म्हणजे विजय. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये 4 सामने खेळले गेले आहेत आणि टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. आता सिडनी कसोटीत टीम इंडियाचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावायची आहे. केवळ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठीच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठीही सिडनी टेस्ट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे.
सिडनी कसोटीच्या एक दिवस आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप खेळू शकणार नसल्याची माहिती टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाने दिली.
रोहित शर्माच्या फलंदाजी आणि कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, सिडनी कसोटीच्या एक दिवस अगोदर असे काही संकेत मिळाले होते की, सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.
खरं तर, शेवटच्या कसोटीच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या सरावासाठी मैदानात आले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
त्या फोटोमध्ये इतर सर्व खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत होते पण रोहित शर्मा कुठेच दिसत नव्हता. रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही हे जाणून घेण्यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत सामन्याच्या दिवशी खेळपट्टी पाहून प्लेइंग-11 ठरवू, असे सांगत रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वृत्ताला खतपाणी घातले आहे. जर रोहित सिडनी कसोटीत खेळला नाही तर त्याच्या जागी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.