Alpha Gereration : मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे ठरवला जातो. या पिढ्या सहसा 15-20 वर्षांच्या कालावधीसाठी टिकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appद ग्रेटेस्ट जनरेशन (GI जनरेशन) (1901-1927) :या पिढीतील बहुतेक लोकांना महामंदीचा सामना करावा लागला होता.
द सायलेंट जनरेशन (1928-1945) : महामंदी आणि दुसरे महायुद्ध यांच्या परिणामांमुळे ही पिढी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते.
बेबी बूमर पिढी (1946-1964) : या काळात लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे या पिढीला बेबी बूमर्स असे नाव देण्यात आले.
जनरेशन X (1965-1980) : नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट आणि व्हिडीओ गेम्सची सुरुवात या काळात झाली
मिलेनियल्स किंवा जनरेशन Y (1981-1996) : सर्वाधिक बदल या पिढीने पहिले आणि तंत्रज्ञानाने स्वतः ला प्रगल्ब केले
जनरेशन Z (1997-2009) : इंटरनेट जगात या पिढीचा जन्म झाला असल्याने, ही पिढी इंटरनेट आणि गॅजेट वर अवलंबून आहे
जनरेशन अल्फा (2010-2024) : सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा भडिमार या काळात झाला आणि त्यात या पिढीचे आणि त्यांच्या पालकांचे आकर्षण वाढले
जनरेशन बीटा (2025-2039) : जनरेशन बीटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा अधिक प्रभाव पडेल. 1 जानेवारीपासून ही मुले अशा जगात वाढतील जिथे तंत्रज्ञान जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असेल.