Rohit Sharma : रोहित शर्मा ते अभिषेक शर्मा, टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक आतापर्यंत कुणी केलं?
झिम्बॉब्वे विरुद्ध अभिषेक शर्मानं वादळी खेळी करत शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्मा पहिल्या टी 20 मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला होता. त्यानं केवळ 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. मात्र, रोहित शर्मनानं 2017 ला केवळ 35 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. रोहितनं त्या डावात 12 चौकार अन् 10 षटकार मारले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगानं शतक करणऱ्यांच्या यादीत भारतात सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवनं 45 बॉलमध्ये 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 45 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
अभिषेक शर्मा आणि के.एल. राहुल यांनी 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं आहे. 2016 मध्ये के.एल. राहुलनं वेस्ट इंडिच विरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती.
अभिषेक शर्मानं केवळ 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं आणि क्रिकेटमध्ये वेग आणि टायमिंग महत्त्वाचं असतं, असं जणकारांनी म्हटलं
शुभमन गिल आणि सुरेश रैनानं देखील भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावलेलं आहे.