एक्स्प्लोर
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला करणार गुडबाय?; 'गुरु'च्या संघाकडून खेळण्याची शक्यता, महत्वाची अपडेट समोर
Rishabh Pant IPL: आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Rishabh_Pant_IPL
1/8

आयपीएलमधील (IPL 2025) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant)बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Image Credit-IPL)
2/8

ऋषभ पंत आयपीएल 2025 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. (Image Credit-IPL)
3/8

ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला गुडबाय करत क्रिकेटमधील त्याचा 'गुरु' महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Image Credit-IPL)
4/8

सदर वृत्ताबाबत अजून ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. (Image Credit-IPL)
5/8

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला रिलीज केल्यास चेन्नई सुपर किंग्स आपल्या ताफ्यात त्याला दाखल करेल. (Image Credit-IPL)
6/8

चेन्नईने याबाबत संकेतही दिले आहेत की, जर एमएस धोनीने आयपीएलमधून निवृ्त्तीचा निर्णय घेतल्यास धोनीच्या जागी भारतीय यष्टीरक्षकला संघात घेतले जाईल. (Image Credit-IPL)
7/8

नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात ऋषभ पंतने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. यामध्ये त्याने 8 सामन्यात 171 धावा केल्या. (Image Credit-BCCI)
8/8

एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वांत जास्त सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. एका रिपोर्टनूसार आयपीएल 2025 च्या हंगामात धोनी खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता फार कमी आहे. (Image Credit-IPL)
Published at : 20 Jul 2024 02:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
