Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
टीम इंडियातील धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएलच्या केकेआर संघातील वादळी बॅट्समन असलेल्या रिंकु सिंगचा साखरपुडा नुकताच पार पडला. विशेष म्हणजे युपीच्या पठ्ठ्याने MP कन्या पटवल्याचं पाहायला मिळालं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंकुचा साखरपुडा समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत झाला आहे. ट्विटरवरील क्रिकेटची माहिती देणाऱ्या मुफद्दल वोहरा या अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रिंकुची भावी पत्नी असलेल्या प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे.
गत 2024 मध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला.
प्रिया सरोजचे वडील देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा खासदार राहिले आहेत. सन 1999, 2004 आणि 2009 साली ते येथून खासदार होते.
वडिलानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत.
दरम्यान, शाहरुख खानने रिंकुच्या तुफानी फलंदीजीनंतर मी तुझ्या लग्नात डान्स करणार असे म्हटले होते, त्यानुसार आता रिंकू व प्रिया यांच्या लग्नात शाहरुखचा डान्स पाहायला मिळणार आहे.