Ravindra Jadeja : जाडेजाची संपत्ती किती, बीसीसीआयकडून वर्षाला किती रुपये मिळतात?
Ravindra Jadeja Net Worth : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा महागड्या गाड्यांचा शौकिन आहे. त्यासोबत त्याच्याकडे सुपर बाईक्सही आहेत. त्याला बीसीसीआयकडून कोट्यवधींचं मानधन मिळतं. त्याशिवाय जाहिरातीमधूनही तो मोठी कमाई करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजानं दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात पाच विकेट आणि अर्धशतकी खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला. क्रिकेटशिवाय जाडेजाला घोड्यांची आवड आहे. त्याच्याकडे अनेक घोडे आहेत.. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
2009 मध्ये रविंद्र जाडेजानं भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यानं 296 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. फलंदाजीत त्याने पाच हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत 500 विकेट्स घेतल्या आहेत.
अष्टपैलू खेळीनं त्यानं जगभरात आपला वेगळ चाहतावर्ग तयार केला आहे. त्याला सर रविंद्र जाडेजा असेही म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, जाडेजाकडे 75 कोटींची संपत्ती आहे. गेल्या काही वर्षात जाडेजाच्या संपत्तीत 40 टक्केंनी वाढ झाली आहे.
बीसीसीआय, आयपीएल कॉन्ट्रेक्ट आणि जाहिरातीच्या माध्यमातून जाडेजा कमाई करतो. जाडेजा बीसीसीआयच्या ए लिस्टमध्ये आहे. त्याला बीसीसीआयकडून वर्षाला पाच कोटी रुपये पगार मिळतो. त्याशिवाय कसोटी, वनडे आणि टी20 च्या प्रत्येक सामन्यासाठी मानधनही दिले जाते. तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे.
जाडेजा गाड्यांचाही शौकिन आहे. रिपोर्स्टनुसार, त्याच्याकडे दोन लग्जरी कार आहेत. यामध्ये ऑडी क्यू7 (Audi Q7) आणि बीएलडबल्यू एक्स7 (BMW X7) यांचा समावेश आहे. त्याशिवाय 10 लाख रुपयांची हायाबुसा सुपर बाइकही आहे.
रिपोर्ट्सनुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये जाडेजाचं चार मजली रॉयल बंगला आहे.