Aero India 2023: 'अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी', पंतप्रधानांच्या हस्ते एरो इंडिया कार्यक्रमाचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरूमधील येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर एरो इंडिया 2023 या कार्यक्रमाच्या 14 च्या भागाचे उद्घाटन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” ही या वर्षीच्या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाची संकल्पना असून या कार्यक्रमात 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह जगभरातील 80 हून अधिक देशांचा सहभाग असणार आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की बेंगळूरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत आहे. “ही नवी उंची म्हणजे नव्या भारताची सत्यता आहे, आज भारत नवनवी उंची गाठत आहे आणि त्याही पलीकडचा विचार करत आहे,” पंतप्रधान म्हणाले.
एरो इंडिया 2023 हे भारताच्या वाढत्या क्षमतांचे झळाळते उदाहरण आहे आणि 100 हून अधिक देशांचा या कार्यक्रमातील सहभाग संपूर्ण विश्वाचा भारतावर असलेल्या विश्वासाचे दर्शन घडवतो असे पंतप्रधानांनी सांगितले.
जगातील अनेक नावाजलेल्या कंपन्यांसह, भारताच्या एमएसएमई उद्योगांच्या सोबत 700 हून अधिक कंपन्यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे, याकडे त्यांनी निर्देश केला. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत जात आहे.
या प्रदर्शनासोबत आयोजित करण्यात आलेली संरक्षण मंत्र्याची बैठक तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद यांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील सक्रीय सहभाग एरो इंडियाचे सामर्थ्य वाढवेल.
भारताचे तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या कर्नाटकात होत असलेल्या एरो इंडिया कार्यक्रमाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
ते म्हणाले की, या कार्यक्रमामुळे कर्नाटकातील युवकांसाठी हवाई दल क्षेत्रात नवे मार्ग खुले होतील. देशाला बळकट करण्यासाठी कर्नाटकच्या युवकांनी त्यांच्याकडील तांत्रिक कौशल्याचा वापर संरक्षण क्षेत्रात करायला हवा.
“नवी विचारधारणा आणि नव्या दृष्टीकोनासह जेव्हा देश प्रगती करतो तेव्हा देशातील यंत्रणा देखील त्या विचारधारणेनुसार बदलू लागतात,” पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, भारताचे यश त्याच्या क्षमतेची साक्ष देत आहे. तेजस, आयएनएस विक्रांत, सुरत आणि तुमकूर निर्माणामधील प्रगत सुविधा, या आत्मनिर्भर भारताच्या क्षमता आहेत ज्याच्याशी जगातील नवीन पर्याय आणि संधी जोडल्या गेल्या आहेत.