एक किलोचं एक वांगं, भंडाऱ्यातील वांगी पोहचली अमेरिकेला
एका वांग्याचं वजन जास्तीत जास्त तीनशे ग्रामपर्यंत बघितलं आहे. मात्र, ठोंबरे यांच्या शेतातील एका वांग्याचं वजन तब्बल एक ते दीड किलो वजनाचे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वास बसणार नाही पण, हे सत्य असून या चवदार वाग्यांना भंडारा जिल्ह्यातचं नव्हे तर, नागपूर, मुंबईपर्यंत नव्हे तर, अमेरिकेतही ही वांगी पोहचली आहे.
भंडारा जिल्ह्यातील बेटाळा हे गाव जिल्ह्यात वाळूसाठी सर्वदूर परिचित आहे. सुपीक वाळूच्या खोऱ्यातील वांगीही आता गावाची ओळख निर्माण करीत आहेत.
दिलीप ठोंबरे या शेतकऱ्यांनं त्यांच्या शेतात लावलेल्या पाऊण एकरातील चवदार वांगी आता चर्चेचा विषय ठरला आहे.
दिलीप ठोंबरे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. नवीन पीक घेवून वेगळं काही तरी, करण्याचा ध्यास असलेल्या दिलीप यांनी त्यांच्या पाऊण एकरात पाच पद्धतीचे वेगवेगळी वांगी लावली.
यात एक लांब पद्धतीचा आणि दुसरा गोल पद्धतीचं वांगी असून ही दोन्ही वांगी एक ते दीड किलो वजनाची आहेत. तर, इतर वांगी साधारण वजनाची आहेत.
30 रुपये किलो दरानं त्यांनी वांगी विकली असून आतापर्यंत त्यांना सर्व खर्च वजा जाता 40 हजारांचा नफा प्राप्त झाला आहे.
शेतकरी ठोंबरे यांचे नातेवाईक अमेरिकेत राहतात, त्यांना ही वांगी चवदार वाटल्यानं त्यांनीही भंडारा इथून वांगी नेली आहेत.
विशेष म्हणजे, सर्व वांगी खायला अगदी चवदार आहेत. आता या वाग्यांना मोठी मागणी आहे.
भंडारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या वजनाची वांगी बाजारात विक्रीसाठी आली असून त्याची भाजी किंवा भरीत खाल्ल्यानंतर नागरिकांच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत असून घराघरांतून या वाग्यांना मोठी मागणी होत आहे.