R Aswin Retirement: बाहेर मुसळधार पाऊस, तो काहीतरी बोलला अन्...; विराट अन् रोहितला अश्विनच्या निवृत्तीबाबत कळताच काय घडलं?
भारताचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Aswin Retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 700 हून अधिक विकेट्स घेतल्या.
सध्या खेळवण्यात येणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज पावसामुळे रद्द झाल्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना थांबवण्यात आला होता. यावेळी मुसळधार पाऊस सुरु असताना विराट कोहली आणि अश्विन यांच्यात काहीतरी बोलणं झालं.
विराट कोहलीला आर अश्विनने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती दिली असावी. यानंतर लगेच विराट कोहलीने अश्विनला मिठी मारली.
भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली.
रोहित शर्मासोबत या पत्रकार परिषदेत अश्विन देखील सहभागी झाला आणि यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केली. यानंतर रोहित शर्माने देखील अश्विनला भर पत्रकार परिषदेत मिठी मारली.
भारत आणि ऑस्ट्रेलियातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता पुढील सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.