IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
डिसेंबर महिन्यात 17 कंपन्यांचे आयपीओ लाँच झाले आहेत. काही कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्याचं पाहायला मिळालं. आता वेंटिव हॉस्पिटलिटीचा आयपीओ येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेंटिव हॉस्पिटलिटीचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 20 डिसेंबरला खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1600 कोटींच्या उभारणी केली जाणार आहे. 24 डिसेंबरला आयपीओ सबसक्रिप्शन बंद होईल.
वेंटिव हॉस्पिटलिटीनं किंमतपट्टा 610-643 रुपयांच्या दरम्यान असेल. अँकर इन्वेस्टर्स 19 डिसेंबरपासून गुंतवणूक करु शकतील. कंपनी 1600 कोटींचे नवे शेअर जारी करणार आहे.
जेएम फायनान्शिअल, एक्सिस कॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केटस, आयसीआयसीआय सिक्यूरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, एसबीआय कॅपिटल मार्केटस हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. केफिन टेक्नोलॉजी रजिस्ट्रार आहे.
अमेरिकेतील ब्लॅकस्टोन ग्रुप आणि पंचशील रियल्टी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या वेंटिव हॉस्पिटलिटीचा आयपीओ येत आहे. 60 टक्के भागिदारी पंचशीलकडे तर 40 टक्के भागिदारी ब्लॅकस्टोनकडे आहे. 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 137.83 कोटींचा तोटा झाला आहे.