Sankasht Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीला 'या' चुका चुकूनही करु नका; बाप्पा होतील नाराज
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण, बाप्पाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच गोष्टी केल्या तर बाप्पा नाराजही होतो. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या घरातील गणपतीची फ्रेम किंवा एखादी गणपतीची मूर्तीचे तोंड दक्षिण दिशेला असेल तर असे करु नका. बाप्पाला दक्षिण दिशा आवडत नाही. असे केल्याने तुमच्या घरावर दारिद्र्य येण्याची शक्यता असते. बाप्पा तुमच्यावर नाराज होऊ शकतात. आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात विघ्न येऊ शकते.
एक गोष्ट लक्षात ठेवा की गणपतीची पूजा करताना नेहमी गणपतीला तुळशीपत्र वाहू नका.
पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार, गणपतीने तुळशीला शाप दिला होता. त्याऐवजी तुम्ही दुर्वा किंवा लाल रंगाचे फूल अर्पण करु शकता.
एक गोष्ट लक्षात घ्या की, गणपती बाप्पाला कधीही सुकी फुलं वाहू नका. सुकलेले फूल जर तुम्ही कोणत्याही देवाला वाहत असाल तर ते अशुभ मानले जाते.
त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते. तसेच, तुमचे आरोग्यही बिघडते.
केतकीचे फूल बाप्पाला अर्पण करु नका. पौराणिक मान्यतेनुसार, भगावान शंकराला केतकीचे फूल आवडत नसे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )