In Pics : राहुल चाहर अडकला लग्नबंधनात, गर्लफ्रेंड ईशानीसोबत केलं लग्न
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहरने (Rahul Chahar) त्याची गर्लफ्रेंड ईशानीसोबत (Ishani) लग्न केलं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नाचे फोटो पोस्ट करण्याआधी राहुलने काही विधी करतानाचे व्हिडीओ शेअर केले होते.
राहुलने फेरे घेतानाचे फोटो शेअर केले असून गोव्यातील एका समुद्रकिनारी त्याने विवाह केला आहे.
ईशानी आणि राहुल यांच्या फोटोना अनेकजण लाईक करत असून कमेंट्सचाही वर्षाव पडत आहे.
राहुलने याआधीही ईशानीसोबत फोटो शेअर केले आहेत.
ईशानी आणि राहुल मागील बऱ्याच काळापासून प्रेमबंधनात आहेत.
आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ गाजवल्यानंतर राहुलने भारतीय संघाकडून विश्वचषकही खेळला.
त्यानंतर आता यंदा (IPL 2022) त्याला 5.25 कोटींना पंजाब संघाने विकत घेतलं आहे. दरम्यान राहुल चाहर आता आगामी आयपीएलसाठी तयार झाला असताना आता त्याआधी त्याने लग्न उरकून घेतलं आहे.