Photo Gallary : वयाच्या साठी-पन्नाशीतही हिमालय कवेत घेणार 10 रणरागिणी!
भारतातील दहा महिला या विचाराला फाटा देत फीट@फिफ्टी या खास मोहिमेला निघाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महिला गिर्यारोहक तब्बल 4 हजार 977 किलोमीटरच्या हिमालयीन ट्रेकवर चालल्या आहे.
पद्मभूषण आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वात या महिला गिर्यारोहक 12 मार्च पासून अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून मोहिमेला सुरुवात करणार आहे.
या दहा रणरागिणींमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बिमला नेगी देऊस्कर या सुद्धा आहेत.
उत्तुंग हिमालय हा नेहमीच जगभरातील गिर्यारोहकांचे आकर्षण आणि तेवढेच मोठे आव्हान देखील आहे.
हिमालयातील अत्यंत खडतर दऱ्या खोऱ्यातून तब्बल 4 हजार 977 किमीची पायी ट्रेकिंग करणार आहे
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या हिमालयातील 39 खिंडी या महिला ट्रेकिंग करत पार करणार आहे.