PHOTO: 'ठरलं तर मग' मालिकेतील अस्मिताचा म्हणजेच मोनिका दबडेच्या डोहाळेजेवणाचे खास फोटो!
'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्याशीही प्रेक्षक जोडले गेले आहेत.
'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन सुभेदारची बहिण अस्मिताची भूमिका साकारणारी मोनिका दबडे हिने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री मोनिका दबडे लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई होणार आहे.
मालिकेच्या सेटवर नुकतंच मोनिका दबडेचं डोहाळेजेवण पार पडलं.
‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या सगळ्या अभिनेत्रींनी मिळून मोनिकासाठी खास डोहाळेजेवणाचं सरप्राइज प्लॅन केलं होतं.
डोहाळेजेवणासाठी मोनिका छान नटून-थटून तयार झाली होती.
सुंदर साडी नेसून, त्यावर मोनिकाने फुलांचे दागिने घातले होते.
“ज्या क्षेत्रात आपण काम करतो, तिथल्या मैत्रिणींकडून असं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा मला खरंच वाटतं की मी किती भाग्यवान आहे. माझ्या आईने जेवढ्या आवडीने माझं डोहाळे जेवण केलं असतं, त्याच्या दुपटीने या माझ्या मैत्रिणींनी माझं सगळं केलं.” असं कॅप्शन लिहित मोनिकाने डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी देखील मोनिकाच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली होती.
मोनिका दबडे तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत एप्रिल 2025 मध्ये करणार आहे