Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : पाकिस्तानचा क्रिकेटर कामरान अकमल निवृत्त, सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकामरान अकमल मागील बऱ्याच काळापासून पाकिस्तान संघातून बाहेर होता. दरम्यान अकमल पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा भाग नसला तरी तो पाकिस्तान सुपर लीगसह इतर लीगमध्ये खेळत होता.
पण आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामरान अकमलने 9 नोव्हेंबर 2002 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ऑगस्ट 2010 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.
दुसरीकडे, जर आपण कामरान अकमलच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने 28 ऑगस्ट 2006 रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना ब्रिस्टलमध्ये खेळला गेला. या यष्टीरक्षक फलंदाजाने 2 एप्रिल 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने 23 नोव्हेंबर 2002 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. मात्र, कामरान अकमल 2017 पासून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये दिसलेला नाही. या यष्टिरक्षक फलंदाजाने 2 एप्रिल 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
त्याचबरोबर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कामरान अकमलकडे नवी जबाबदारी आली आहे. पाकिस्तान सुपर लीग संघ पेशावर झल्मीने कामरान अकमलला संघाचा फलंदाज सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलं आहे. पाकिस्तान सुपर लीग सुरू होण्यापूर्वी कामरान अकमल पेशावर झल्मी संघासोबत सुमारे एक आठवडा घालवणार आहे.