In Pics : ऑस्ट्रेलियाच्या एका यशस्वी कर्णधाराचा क्रिकेटला अलविदा, आरोन फिंचची सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाआधी मागील वर्षीच त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून फिंचला ओळखलं जातं. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2021 साली पहिल्यांदाच T20 विश्वचषक जिंकला होता.
त्यानंतर, कांगारू संघाने 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. आक्रमक फलंदाज असलेल्या फिंचने आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 5 कसोटी सामने खेळले आहेत.
फिंचने निवृत्तीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मला हे जाणवत आहे की मी 2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तो पुढे म्हणाला, मी ऑस्ट्रेलियन खेळाडू, माझा संघ, कुटुंब आणि पत्नी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला सतत साथ दिली. त्याचवेळी, मी माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या सतत पाठिंब्यामुळे.” 2021 साली T20 विश्वचषक आणि 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणं या माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठवणी असतील. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली आहे.
फिंचने कर्णधारपद भूषवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघाला T20 विश्वचषक जिंकवून दिला.
फिंचच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांसह 38.89 च्या सरासरीने एकूण 5406 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, फिंचने 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34.29 च्या सरासरीने 3120 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.
याशिवाय फिंचने कांगारू संघासाठी 5 कसोटी सामनेही खेळले आहेत, परंतु यामध्ये तो खास कामगिरी करु शकला नाही. फिंचने कसोटीच्या 10 डावांमध्ये 27.08 च्या सरासरीने केवळ 278 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 अर्धशतकांची नोंद आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एका यशस्वी कर्णधाराने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा अलविदा केला आहे.