Radhika Kumaraswamy Love Story : 27 वर्ष लहान राधिकासोबत कुमारस्वामींनी केलं होतं लग्न, दोघांची लव्हस्टोरी आजही चर्चेत
Radhika Kumaraswamy Love Story : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची पत्नी कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती आहे. राधिका आणि एचडी कुमारस्वामी यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राजकीय कारणाव्यतिरिक्त ते आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. कुमारस्वामी यांची पत्नी राधिका कुमारस्वामी यांना गुगलवर सर्च केले जातं. त्या कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत. कुमारस्वामी आणि राधिका यांच्यात वयाचं अंतर खूप जास्त आहे.
कुमारस्वामी हे सध्या 61 वर्षाचे आहेत, तर त्यांची पत्नी राधिका 36 वर्षांच्या आहेत. राधिका कुमारस्वामी यांनी आतापर्यंत 33 चित्रपटात काम केलेय. कन्नडशिवाय त्यांनी तामिळ चित्रपटातही काम केलेय. कुमारस्वामी आणि राधिक यांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेचा विषय असतो.
2005 मध्ये कुमारस्वामी आणि राधिका यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर भेटी वाढत गेल्या अन् प्रेमात रुपांतर झाले.
2010 मध्ये राधिका आणि कुमारस्वामी यांचं लग्न झालं होतं. राधिकानं स्वत: याबाबत खुलासा केला होता. त्या दोघांचा हा दुसरा विवाह होय. याआधी त्या दोघांचीही लग्न झाली होती.
संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार कुमारस्वामी यांच्याकडे 44 कोटी तर राधिकाकडे 124 कोटींची संपत्ती आहे.