Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
PAK vs CAN : अमेरिका अन् भारताविरुद्ध पराभव, पाकिस्तानपुढं करो वा मरो स्थिती, कॅनडाविरुद्ध एक चूक महागात पडेल....
भारताविरुद्ध पराभव पत्कारल्यानंतर पाकिस्तान आज कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. कॅनडाविरुद्ध पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. आजच्या मॅचमध्ये पराभव झाल्यास पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल. बाबर आझमच्या टीमला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारताविरुद्ध पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव झाला. आता सुपर 8 मध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला आजचमी मॅच जिंकणं आवश्यक आहे.
यंदाच्या टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 20 संघांनी सहभाग घेतला आहे. सर्व संघांची चार गटात विभागणी करण्यात आलेली आहे. ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, अमेरिका, भारत, आयरलँड आणि कॅनडाचा समावेश आहे.
पाकिस्ताननं अटी तटीच्या लढतीत दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. आता कॅनडा विरुद्ध कोणत्याही स्थितीत पाकिस्तानला विजय आवश्यक आहे.
अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर कॅनडानं आयरलँडला पराभू केलं होतं. कॅनडाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिला विजय होता. आज कॅनडा पाकिस्तानला दणका देणार का हे पाहावं लागेल.