शेअरची किंमत फक्त 9 रुपये, पण अनेकजण झाले मालामाल, 'ही' कंपनी भविष्यातही देणार चांगले रिटर्न्स?
मुंबई : सध्या शेअर बाजारात स्मॉलकॅप कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसतायत. या स्मॉलकॅप कंपन्यांत दावणगेरे शुगर कंपनी लिमिटेड या कंपनीचेही नाव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कंपनीचे बाजार भांडवल 914 कोटी रुपये आहे. आज चालू सत्रादरम्यान या कंपनीचा शेअर 9.80 रुपयांवर ट्रेड करतोय. गेल्या तीन वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 643 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
दावणगेरे शुगर कंपनी लिमिटेड या कंपनीचे 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 11.50 आहे. तर 52 आठवड्यांतील सर्वांत कमी मूल्य 6.72 रुपये आहे.
दावणगेरे शुगर कंपनीने गेल्या पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. अनेक ब्रोकरेज फर्म्सने या कंपनीत पैसे गुंतवताना 15 रुपयांचे टार्गेट ठेवावे, असा सल्ला दिला आहे.
आगामी काळात या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 7 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा, असे काही ब्रोकर्सने सुचवले आहे.
दावणगेरे शुगर कंपनीकडून मका, तांदूळ, उस आदींपासून इथेनॉल निर्मितीचे काम केले जाते. ही कंपनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक आदी राज्यांकडून उसाची खरेदी करते आणि त्यापासून साखर तयार करते. सोबतच ही कंपनी इथेनॉल निर्मितीचेही काम करते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)