संघात आता कुणीही मित्र नाही, फक्त.... - अश्विनच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
आताच्या भारतीय संघात कोणी मित्र नाहीत. हे सर्व सहकारी आहेत, अशी प्रतिक्रिया अश्विन याने दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक काळ असा होता जेव्हा संघातील सहकारी मित्र होते. आता प्रत्येकाला स्वतःला पुढे जायचेय. त्यामुळे कुणाला विचारायला वेळ नाही, की तू काय करतोय? हा एक एकाकी प्रवास आहे, असेही अश्विन म्हणाला आहे.
इंग्लंडवरुन परतल्यानंतर अश्विन याने दिलेल्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच टीम इंडियात सर्व काही सुरळीत आहे का ? असा सवालही उपस्थित झालाय.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची आपली इच्छा होती असे देखील म्हटले. पण इंग्लंडमधील वातावरणामुळे हे शक्य झाले नाही असे देखील त्याने कबूल केले.
चांगला फलंदाज असताना मी गोलंदाजीत कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला हे कुठेतरी शेवटी खटकेल, अशी खंत अश्विन याने व्यक्त केली.
अश्विन याच्या मुलाखतीनंतर टीम इंडियात सर्व काही ठिक नसल्याचे अनेकजण म्हणत आहेत. अश्विन याच्या मुलाखतीची सध्या क्रीडा वर्तुळात चर्चा सुरु आहे.