वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबाच्या कबरीला भेट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रकाश आंबेडकर यांनी या कबरीला भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेने बरोबर आहेत.
त्यामुळे आता यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
छत्रपती संभाजी नगर मधील खुलताबाद येथे औरंगजेबाची ही कबर आहे.
औरंगजेब हा धार्मिक होता असं इतिहासकार सांगतात. त्यामुळेच त्याची कबर ही औरंगाबादच्या खुलताबादमध्ये असल्याचं म्हटलं जातं.
कारण त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर खुलताबादमध्येच पुरण्यात यावी अशी त्याची इच्छा होती.
कारण त्याचे गुरु सुफी संत शेख झैनद्दीन यांचा खुलताबादमध्ये दर्गा आहे.
पण प्रकाश आंबेडकरांच्या या भेटीमुळे आता कोणते वाद निर्माण होणार हे पाहणं गरजेचं आहे.