Ind vs Aus : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ODI सामना खेळणार? दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठे अपडेट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये झाला. आता दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु त्याआधी टीम इंडिया 50-50 षटकांचा एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे, तर या मालिकेत दोन्ही संघांमध्ये फक्त 5 कसोटी खेळल्या जाणार आहेत. मग 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अचानक एकदिवसीय सामना कसा काय ते जाणून घेऊया.....
ॲडलेड ओव्हलवर मालिकेतील दुसरी कसोटी डे-नाईट असेल, जी पिंक बॉल टेस्ट खेळली जाईल. हा सामना लक्षात घेऊन टीम इंडियाला आजपासून म्हणजेच 30 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय पिंक बॉलचा सराव सामना खेळायचा होता. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला.
आता सराव सामन्याला फक्त एक दिवस उरला आहे. उरलेल्या एका दिवसात दोन्ही संघ 50-50 षटकांचे सामने खेळतील. अशाप्रकारे टीम इंडियाला 50 षटकांच्या सामन्यांसाठी पिंक बॉलने सराव मिळेल. 50 षटकांचा सामना हा केवळ सराव सामना असेल, पण षटकांच्या दृष्टीने त्याला एकदिवसीय सामनाही म्हणता येईल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा सहभागी होऊ शकला नाही. कारण काही कारणास्त टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकला नव्हता.
रोहितच्या जागी जसप्रीत बुमराहने उपकर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत टीम इंडियाची कमान सांभाळली. आता दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित शर्माचे पुनरागमन झाल्याने तो दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे.